प्रवरासंगम येथील गोदावरीला पूर

Foto
शेतात पुराचे पाणी घुसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान
गंगापूर व नेवाशाला पाणीपुरवठा करणारे जॅकवेल परीसरातील मंदीराला पाण्याने वेढले तर गोदा काठावरील अनेक शेतकर्‍यांची पिके पाण्यात गेल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गंगापूर औरंगाबाद पुणे महामार्गावरील कायगांव टोका प्रवरासंगम-येथील गोदावरीला पूर आला असून गोदामाई दुथडी भरून वाहू लागली आहे गोदावरीला आलेला पूर पहाण्यासाठी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी होतअसून नेवासा शहराला पाणीपुरवठा करणारे जॅकवेल पाण्याखाली आले आहे. 
गोदावरी नदी परिसरातील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असून वरील धरणातून दोन ते अडीच हजार क्युसेस पाणी सोडण्यात आल्याने रात्रीतून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. प्रवरासंगम टोका येथील गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.गोदाकाठी येणार्‍या गावांना यामुळे धोक्याचा ईशारा देण्यात आला असून सिध्देश्वर मंदिराचा घाट पाण्यात गेला तर मुक्तेश्वर , घोटेश्वर आदी मंदिर पुराच्या पाण्याने वेढले गेले आहे तर गाळपेर्‍यांमधील गोदावरी काठावरील जामगाव, 
बगडी, ममदापूर, कानडगाव, नेवरगाव, कायगाव अमळनेर, भिवधानोरा, गंळनिंब, हैबतपुर, अगरकानडगाव, बगडी, जामगाव, कायगाव, लखमापुर, अगर वाडगाव, महालक्ष्मी खेडा, धानोरा, धनगरपट्टी, सावखेडा मांगेगाव, वझर, अमळनेर गावांसह  नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड, मडकी, खलाल पिंपरी, धामोरी व बहिरवाडी या भागात असलेल्या प्रवरानदीला बॅकवॉटरचे पाणी आल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker